भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर गेल्या काही महिन्यांत अनेक महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी झाली आहे. अजूनही अनेक महत्त्वाची प्रकरणं प्रलंबित असून त्यांची सुनावणी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर होऊ घातली आहे. अगदी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणीही सरन्यायाधीशांसमोरच पार पडली असून त्याचा निर्णय त्यांनी राखून ठेवला आहे. या सुनावणीदरम्यान अनेक प्रकरणांमध्ये सरन्यायाधीशांनी वकिलांना किंवा पक्षकारांना परखड शब्दांत सुनावलं आहे. नुकतंच एका वकिलाला त्यांनी चढ्या आवाजात थेट कोर्टातून बाहेर जायलाही सांगितलं होतं. आता तशीच काहीशी घटना पुन्हा घडली आहे.

सरन्यायाधीशांचा परखड स्वभाव!

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अनेक प्रकरणांमध्ये वादी किंवा प्रतिवादी किंवा अगदी त्यांच्या वकिलांनाही गैरवर्तनासाठी सुनावल्याचं दिसून आलं आहे. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांनी अशाच प्रकारे एका वकील महोदयांची कानउघाडणी केली. तसेच, “माझ्या अधिकारांत तुम्ही लुडबुड करू नका”, असंही सरन्यायाधीशांनी या वकिलांना ठणकावून सांगितलं.

Gautam adani bribe
गौतम अदानींच्या अटकेची मागणी, अमेरिकेत खटले दाखल झाल्यानंतर विरोधक आक्रमक
modi receives Guyana s highest honour
पंतप्रधान मोदींना गयाना, डॉमिनिकाचा सर्वोच्च पुरस्कार
no leave blackout social viral
“तुम्ही मेलात तरी तुम्हाला तीन दिवस आधी कंपनीला सांगावं लागेल”, नेटिझन्सचा संताप; सुट्ट्या रद्द करणारी कंपनीची नोटीस व्हायरल!
Arrest warrant issued against Gautam Adani
Arrest warrant issued against Gautam Adani : गौतम अदाणींच्या विरोधात न्यूयॉर्कमध्ये अटक वॉरंट, आता काय होणार?
Pakistan Terrorist Attack :
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; तब्बल ५० जणांचा मृत्यू, २० पेक्षा जास्त जण जखमी
What Supreme Court Said?
Supreme Court : ब्रेक-अप झाल्यास पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
no alt text set
The Sabarmati Report : उत्तर प्रदेशसह सहा भाजपाशासित राज्यात ‘द साबरमती रिपोर्ट’ टॅक्स फ्री; योगी आदित्यनाथ म्हणाले, सर्वांनी…
Deepinder Goyal Zomato Recruitements
Zomato CEO : बिनपगारी अन् फुल्ल अधिकारी, झोमॅटोच्या ‘या’ पदासाठी आले दहा हजार अर्ज; नियम अन् अटी तर वाचा!
Sambit Patra on rahul gandhi allegations
Gautam Adani : अदाणी प्रकरणावर भाजपाचा राहुल गांधींवर पलटवार; म्हणाले, “चारपैकी एकाही राज्यात…”

नेमकं घडलं काय?

सर्वोच्च न्यायालयात दररोज सरन्यायाधीश तातडीने सुनावणीसाठी घेण्याच्या प्रकरणांविषयी निर्णय घेत असतात. मंगळवारी अशाच प्रक्रियेदरम्यान या वकील महोदयांनी न्यायमूर्तींना त्यांच्या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्याची विनंती केली. सरन्यायाधीशांनी १७ एप्रिल रोजी याचिका सुनावणीसाठी घेतली जाईल, असं सांगितल्यानंतरही वकील महोदय मात्र त्याआधीची तारीख मिळावी यासाठी प्रयत्नशील होते.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड १७ तारखेवरच ठाम असल्याचं पाहून वकील महोदयांनी थेट दुसऱ्या खंडपीठासमोर जाण्याची परवानगी मागितली. “जर सरन्यायाधीशांची परवानगी मिळाली तर याचिका लवकर सुनावणीसाठी यावी यासाठी मी दुसऱ्या खंडपीठासमोर हे प्रकरण ठेवतो”, असं ते म्हणाले.

“१७ एप्रिल म्हणजे १७ एप्रिल!”

पण त्यावर सरन्यायाधीशांचा पारा चढला आणि त्यांनी वकील महोदयांना चांगलंच फैलावर घेतलं. “तुमच्या या युक्त्या माझ्यासमोर वापरू नका. तसं असेल तर मग इथे हे प्रकरण आणूच नका. मग नंतर दुसरीकडे आधीच्या तारखेसाठी हे प्रकरण मांडा. माझ्या अधिकारांत लुडबुड करू नका. जर हे प्रकरण १७ एप्रिलला लिस्टेड झालंय, तर ते १७ एप्रिललाच येईल. माझ्या अधिकारांत हस्तक्षेप करू नका”, असं सरन्यायाधीशांनी सुनावलं.

…आणि सरन्यायाधीश मोठ्यानं ओरडले!

याआधीही असाच एक प्रसंग सर्वोच्च न्यायालयात घडल्याचं पाहायला मिळालं होतं. फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या मालकीच्या जागेत वकिलांसाठी कार्यालये बांधण्यासंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावेळीही याचिका लवकर सुनावणीसाठी घेण्याबाबत वरीष्ठ सरकारी वकील विकास सिंह यांनी सरन्यायाधीशांकडे तगादा लावला होता. त्यावेळी सरन्यायाधीशांनी विकास सिंह यांना आवाज चढवून सुनावलं होतं. “तुम्ही आत्ताच्या आत्ता कोर्टातून चालते व्हा”, असंही न्यायमूर्तींनी सुनावलं होतं.