सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा एकदा नकार दिला. गुंतवणूकदारांचे पैसे कसे परत करणार याचा ठोस प्रस्ताव द्यावा, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले.
न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याबद्दल सुब्रतो रॉय सध्या अटकेत आहेत. सहाराने गुंतवणूकदारांचे ५ हजार कोटी रोख आणि ५ हजार कोटी बॅंक गॅरंटीच्या स्वरुपात देण्यासंदर्भात पुढच्या आठवड्यात ठोस प्रस्ताव द्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने स्पष्ट केले. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीशांनी नव्या पीठाची नियुक्ती केली आहे. त्यांच्यापुढे सोमवारी पहिल्यांदाच या प्रकरणाची सुनावणी झाली.
गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासंदर्भात सहारा समुहाने दिलेला प्रस्ताव तर्कशुद्ध आणि स्वीकारार्ह असला पाहिजे, असेही न्यायालयाने त्यांना सांगितले. सुब्रतो रॉय यांना तिहार तुरुंगाऐवजी लखनौमधील त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवावे, अशी मागणी करणारी याचिकाही न्यायालयाने फेटाळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा