गोव्यातील अंजुना परिसरातील ‘कर्लीज’ रेस्तराँच्या पाडकामाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तातडीच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने या रेस्तराँचे पाडकाम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. सागरी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडून हे रेस्तराँ पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासून गोवा सरकारकडून हे पाडकाम करण्यात येत होते.

“कुणाचं बटण कसं दाबायचं हे…”, अजित पवारांचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोला; २०१९ची करून दिली आठवण!

भाजपा नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर हे रेस्तराँ चर्चेत आले होते. मृत्यूच्या काही तासांपूर्वी याच रेस्तराँमध्ये फोगट या पार्टी करत होत्या, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेत तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची आज तातडीची सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पाडकामाला स्थगिती दिली आहे. पुढील आदेशापर्यंत या रेस्तराँमधील व्यावसायिक उपक्रम बंद ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी बुधवारपर्यंत उत्तर देण्याची नोटीस न्यायालयाने गोवा सरकारला बजावली होती. रेस्तराँ पाडकाम प्रकरणाची पुढील सुनावणी आता येत्या शुक्रवारी होणार आहे.

“कुठलाही राजमुकुट काटेरी असतो आणि तो…”, राज ठाकरेंची ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना आदरांजली!

राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने ८ नोव्हेंबरला रेस्तराँच्या पाडकामाचे आदेश दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गोवा सरकारकडून हे रेस्तराँ पाडण्यास सुरुवात करण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांचे वकील अहमदी यांनी केला आहे. या मालमत्तेचा ४२/१० या जून्या भूखंडावरील बांधकाम पाडण्यात येऊ नयेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या रेस्तराँने अंजुना परिसरात अनधिकृत बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्यास हे बांधकामही पाडले जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे.