अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षा पुन्हा घेण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी वाढवून दिली. १७ ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर करावा, असे निर्देश न्यायालयाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (सीबीएसई) दिले. चार आठवड्यांमध्ये परीक्षा पुन्हा घेणे शक्य नसल्याचे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने गुरुवारी न्यायालयापुढे स्पष्ट केले होते. फेरपरीक्षा घेण्यासाठी आणखी मुदत देण्याची विनंती सीबीएसईकडून न्यायालयाकडे करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी हा निर्णय दिला.
मे महिन्यात घेण्यात आलेली परीक्षा ४४ विद्यार्थ्यांनी केलेल्या गैरप्रकारांमुळे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली असून, आता ६.३ लाख विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठी सीबीएसईला न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिली होती. सुटीतील पीठाचे न्यायमूर्ती आर. के. अगरवाल व न्या. अमिताव रॉय यांनी या परीक्षेशी संबंधित संस्थांनी नव्याने परीक्षा घेण्यासाठी सीबीएसई या संस्थेची मदत घेण्यास सांगितले होते. मात्र, सीबीएसईने चार आठवड्यांमध्ये फेरपरीक्षा घेणे शक्य नसल्याचे म्हटले होते.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jun 2015 रोजी प्रकाशित
वैद्यकीय प्रवेश परीक्षा पुन्हा घेण्याची मुदत वाढविली
अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षा पुन्हा घेण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी वाढवून दिली.

First published on: 19-06-2015 at 02:26 IST
TOPICSवैद्यकीय प्रवेश परीक्षा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court gives cbse more time for re test