K Kavitha Bail News: दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी भारत राष्ट्र समितीच्या नेत्या तथा माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आमदार के.कविता यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणामध्ये के कविता यांना मार्चमध्ये ईडीकडून अटक करण्यात आली होती. गेल्या ६ महिन्यांपासून त्या तुरुंगात आहेत. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने आमदार के.कविता यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी १५ मार्च रोजी छापे टाकले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान, के कविता यांच्यावर दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाच्या नेत्यांशी १०० कोटींचा व्यवहार केल्याचा दावा ईडीने केला होता. आज के.कविता यांच्या जामीनावरील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणातील कोणत्याही पुराव्यांशी छेडछाड करणार नाही, तसेच साक्षीदारांवर कोणताही प्रभाव टाकणार नाही, या अटीसंह सर्वोच्च न्यायालयाने के कविता यांना जामीन मंजूर केला आहे.

Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Dhankawadi gambling den, Raid on gambling den,
पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा
Delhi High Court
Delhi High Court : वकिलाकडून न्यायमूर्तीवर अपमानास्पद टिप्पणी; दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावली चार महिन्यांची शिक्षा
drug cartel kingpin lalit patil
चाकणमधील मेफेड्रोन प्रकरण;  खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ; अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी

हेही वाचा : Rahul Gandhi on PM Narendra Modi: “माझी पंतप्रधान मोदींबाबत अडचण ही आहे की…”, राहुल गांधींनी सांगितली दोन कारणं; म्हणाले…

के.कविता यांच्यावर काय आरोप आहेत?

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी १ डिसेंबर २०२२ रोजी सीबीआयने के.कविता यांची त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी चौकशी केली. ही चौकशी जवळपास सात तास चालली होती. ईडीच्या म्हणण्यानुसार, के.कविता या आम आदमी पक्षाला १०० कोटींची कथित लाच देणाऱ्या ‘साऊथ ग्रुप’शी संबंधित आहेत. दिल्लीतील अबकारी धोरण बदलून आपल्याला फायदा मिळेल, असे धोरण आखण्यासंबंधी ही लाच देण्यात आली होती, असा आरोप ईडीकडून करण्यात आला होता.

के.कविता कोण आहेत?

के.कविता या माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत. तसेच विधान परिषदेच्या आमदार आहेत. कविता यांनी २०१४ मध्ये सक्रीय राजकारणात प्रवेश केला. यानंतर त्यांनी ‘बीआरएस’कडून २०१४ ला लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर त्या २०२१ मध्ये विधानपरिषदेवर निवडून आल्या होत्या.

मद्य धोरण प्रकरणात कोणत्या नेत्यांवर कारवाई झाली?

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया, ‘आप’चे खासदार संजय सिंह यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली होती. मनीष सिसोदिया हे जवळपास एक वर्षांपासून तुरुंगात होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांना जामीन मंजूर झाला. तसेच संजय सिंह यांनाही जामीन मंजूर झालेला आहे. दिल्ली मद्य गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक झालेली असून ते सध्या तुरुंगात आहेत.