सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाकडून आज (बुधवार) सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, जामीन मिळवण्यासाठी न्यायालयाने रॉय यांना सेबीकडे १० हजार कोटी रूपये जमा करण्याचे आदेशही दिले आहेत. दरम्यान, १० हजार कोटी उभारण्यासाठी सहाराची बॅंक खाती गोठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने संमती दिली आहे. गुंतवणूकदारांकडून घेतलेली सर्व २० हजार कोटी रुपयांची देणी वर्षभरात अदा करण्याचे आश्वासन देणारा नवा प्रस्ताव सहारा समूहाने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता.
सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात झाली. या वेळी समूहाने गुंतवणूकदारांची २० हजार कोटी रुपयांची देणी वर्षभरात देण्याचा नवा प्रस्ताव सादर करण्यात आला. यानुसार येत्या तीन दिवसांत २,५०० कोटी रुपये तर प्रत्येकी ३,५०० कोटी रुपये पुढच्या तीन तिमाहींना देण्यात येतील, असे समूहामार्फत न्या. के. एस. राधाकृष्णन व न्या. जे. एस. केहर यांच्यासमोर सांगण्यात आले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा