SC Hearing on Municipal Corporation Election Live Updates : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आज (मंगळवार, २५ फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे राज्यातील जनतेचं व राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे. न्यायालय या संदर्भात शासनाला, निवडणूक आयोगाला काय निर्देश देणार याबाबत सर्वांच्याच मनात उस्तुकता आहे. न्यायालय आजच निर्देश देणार की सुनावणीची पुढची तारीख देणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते या निवडणुका ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुढे ढखलल्या जाऊ शकतात. या सर्व चर्चा व प्रश्नांना आज पूर्णविराम मिळू शकतो.
SC Hearing on Corporation Election Live, 25 February 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अपडेट्स एकाच क्लिकवर.
एप्रिल-मे महिन्यात निवडणूक घेणे शक्य
आजच्या सुनावणीत सकारात्मक निर्णय झाला आणि न्यायलयाने निवडणूक घेण्याबाबत हिरवा कंदील दर्शविला तर राजकीय पक्षांना आणि इच्छुकांना मोठा दिलासा मिळणार आहे. न्यायलयाने सकारात्मक निर्णय दिल्यास राज्यातील मुंबई, नवी मुंबई महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मे महिन्याच्या अखेरपर्यंत घेणे शक्य आहे.
आज निकाल लागणार?
याआधी २५ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. त्यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणी २५ मार्च रोजी होईल असं संगितलं होतं.
अनेक याचिका प्रलंबित
मुंबई महापालिकेसह राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. अनेक ठिकाणी पाच ते सहा वर्षांपासून निवडणुकाच झालेल्या नाहीत. अनेक शहरांचा कारभार प्रशासकांच्या हाती सोपवण्यात आला आहे. या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत. त्यावर आज सुनावणी होणार आहे.