गुजरातमधील २००२ साली दंगलीबाबत स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने(एसआयटी) मोदींना निर्दोष ठरविल्याविरोधात दाखल करण्यात आलेली पुर्नविचार याचिका आज(शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
एसआयटीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत मोदी यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात याआधी सादर केला होता. याविरोधात पुर्नविचार याचिका दाखल करण्यात आली होती न्यायाधीस एच.एल.दत्तू यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे मोदींना दिलासा मिळाला आहे.
सध्याची परिस्थिती पाहता एसआयटीच्या अहवालावर पुर्नविचार करणे योग्य नाही असे खंडपीठाने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा