सर्वोच्च न्यायालयाने आभासी चलनाच्या (क्रिप्टोकरन्सी) वापरावर लावण्यात आलेली बंदी उठवली असून व्यवहारात वापर करण्यासाठी परवानगी दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) एप्रिल २०१८ मध्ये बिटकॉइनसारख्या आभासी चलनाच्या ट्रेडिंगवर बंदी आणली होती. आरबीआयने बिटकॉइन तसंच इतर आभासी चलनांसंबधी नियम अत्यंत कठीण केले होते. यावेळी त्यांनी बँक आणि इतर आर्थिक संस्थांना कोणत्याही सेवा देण्यापासून बंदी आणली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवण्याचा निर्णय दिला. न्यायालयाने आरबीआय अशा प्रकारची बंदी आणू शकत नाही असं सांगितलं. आरबीआयने आपल्या आदेशात सांगितलं होतं की, कोणत्याही आर्थिक संस्थेने क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करु नये. यासोबतच आरबीआयने सामान्य नागरिकांना क्रिप्टोकरन्सीवर ट्रेडिंग केल्यानंतर होणाऱ्या नुकसानासाठी स्वत: जबाबदार असतील असा इशारा दिला होता.

mage of a laptop or mobile phone with a red "X" symbol, or a Supreme Court building photo
Right To Privacy : नागरिकांच्या गोपनीयतेला ‘सर्वोच्च’ स्थान, आरोपींचा मोबाइल किंवा लॅपटॉप डेटा तपासण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Image of Allu Arjun House
Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणाऱ्या सहा आरोपींना जामीन, हल्लेखोरांशी मुख्यमंत्र्यांचा संबंध असल्याचा आरोप
Supreme Court decision regarding credit card payments print eco news
क्रेडिट कार्ड देयकाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; थकबाकीचा भरणा उशिराने केल्यास वार्षिक ३० टक्के व्याजदराची मर्यादा रद्दबातल
Sensex falls by 964 points print eco news
‘फेड’सावधतेने विक्रीचा रेटा; ‘सेन्सेक्स’ ९६४ अंशांनी गर्भगळित
What Mallikarjun Kharge Said?
Mallikarjun Kharge : “भाजपा खासदारांकडून आमच्यावर हल्ला, आमची खिल्ली उडवली…”, मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप
Sovereign Gold Bond scheme
Sovereign Gold Bond : स्वस्त सोने विकण्याची सरकारची योजना होणार बंद? कारण काय?
Thane Creek to be monitored by High Court Supreme Court directives strengthen conservation efforts
ठाणे खाडीची देखरेख उच्च न्यायालयामार्फत; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे संरक्षण प्रयत्नांना बळ

२०१८ मध्ये आभासी चलन बिटकॉइनचं महत्व आणि किंमत वाढत होती. अनेकांनी बिटकॉइनच्या सहाय्याने मोठी कमाई करत नफा मिळवला होता. बिटकॉइनचा वाढता वापर लक्षात घेता आरबीआयने त्याला चलन म्हणून मान्यता देण्यास नकार दिला होता. सोबतच बिटकॉइनमध्ये ट्रेडिंगमुळे होणाऱ्या नुकसानासाठी आरबीआय जबाबदार राहणार नाही असंही स्पष्ट केलं होतं.

Story img Loader