भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा आज निवृत्त होत आहेत. रमणा यांच्या आज शेवटच्या दिवसाच्या कामकाजाचे सर्वोच्च न्यायालयाकडून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य जनता आज सर्वोच्च न्यायालयातील कार्यवाही लाईव्ह पाहू शकतील. २०१८ च्या निकालानंतर पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे.

हेही वाचा- काँग्रेसला मोठा झटका! गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा

रमणा यांना विशेष निरोप

फ्रीबी प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाचा आदेशावर होणाऱ्या सुनावणीचे आज थेट प्रक्षेपण होणार आहे. निवर्तमान सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील सेरेमोनिअल बेंचसमोर खटले चालवले जाणार आहेत. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे रमणा यांच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करत सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना विशेष पद्धतीने निरोप देण्यात येणार आहे.

हेही वाचा- ‘पीएमएलए’मधील ‘ईडी’च्या सर्वाधिकाराचा फेरआढावा; आक्षेपाच्या दोन मुद्दय़ांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी

वेबकास्ट पोर्टलद्वारे थेट प्रक्षेपण

आज सकाळी १०.३० वाजल्यापासून सरन्यायाधीशांच्या न्यायालयाची किंवा औपचारिक खंडपीठाची कार्यवाही NIC (नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर) वेबकास्ट पोर्टलद्वारे थेट प्रक्षेपित केली जाईल. साधारण २० केसेसचे लाईव्ह स्ट्रीमिंग होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेमध्ये म्हटले आहे.

Story img Loader