मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालायने काहीसा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने २१ मार्चपासून अनिल देशमुख यांची जामीन याचिका प्रलंबित असल्याची नोंद घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“जामीन अर्ज दाखल करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपली याचिका लवकरात लवकर निकाली काढण्यात येईल अशी कायदेशीर अपेक्षा असते. जामीन याचिका प्रलंबित ठेवणं कलम २१ अंतर्गत जगण्याच्या अधिकाराशी सुसंगत नाही,” असं खंडपीठाने सांगितलं.

हेही वाचा – ‘मराठा आरक्षणाची खाज’ वक्तव्यावरुन वाद पेटल्यानंतर तानाजी सावंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “पाळण्यातल्या बाळापासून…”

“आम्ही एक निर्देश जारी करत असून याचिकाकर्त्याला ज्या न्यायमूर्तींकडे खटला सोपवण्यात आला आहे त्यांच्यासमोर अर्ज करण्याची परवानगी देतो. हा अर्ज याच आठवड्यात सुनावणीसाठी घेतला जाईल आणि त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल,” असं खंडपीठाने स्पष्ट केलं.

दरम्यान न्यायालयाने या प्रकरणावर इतर कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला. मुंबई उच्च न्यायालयात एन जे जामदार यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. अनिल देशमुख यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court on anil deshmukh bail application plea pending in supreme court money laundering case sgy