नवी दिल्ली : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा करण्याची एका हिंदू पुजाऱ्याला परवानगी देणाऱ्या वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अलाहाबाद उच्च न्यायालयात दाद मागावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी ज्ञानवापी मशीद समितीला दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी तातडीने सुनावणी करावी अशी विनंती अंजुमन इंतेझामिया मशीद समितीची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला केली. त्यावर, त्यांनी उच्च न्यायालयात जावे असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांना सांगितले असल्याची माहिती निबंधकांनी त्यांना दिली.

हेही वाचा >>> झारखंड सरकार धोक्यात? सत्ताधारी JMM-काँग्रेस आमदारांना तेलंगणात हालवण्याच्या हालचालींना वेग, भाजपा उद्या…

या आदेशाच्या नावाखाली, प्रशासनाने घाईघाईत संबंधित स्थळावर बंदोबस्त तैनात केला असून, मशिदीचे ग्रिल कापण्याची तयारी केली आहे, असे निझाम पाशा  यांनी त्यांच्या अर्जात सांगितले.

‘आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी कनिष्ठ न्यायालयाने एक आठवडा दिला असताना, रात्रभरात घाईघाईने असे काम हाती घेण्याचे प्रशासनाला काही कारण नव्हते. मशीद व्यवस्थापन समितीला या आदेशाविरुद्ध कायदेशीर मार्गाचा अवलंब करता येऊ नये, यासाठी प्रशासन वादींशी संगनमताने करत असलेले प्रयत्न हेच या घाईचे कारण आहे’, असे या पत्रात म्हटले आहे.

ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा

वाराणसी : तीन दशकांपूर्वी खंडित करण्यात आलेली पूजा पुन्हा सुरू करण्याची परवानगी देणाऱ्या न्यायालयाच्या आदेशानंतर, वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात बुधवारी रात्री पूजा करण्यात आली, अशी माहिती काशी विश्वनाथ मंदिर न्यासाच्या अध्यक्षांनी दिली. काशी विश्वनाथ मंदिराचे दिवंगत पुजारी सोमनाथ व्यास यांचे नातू शैलेंद्रकुमार पाठक हे ज्ञानवापी मशिदीच्या तळघरातील मूर्तीची पूजा करू शकतात, असा निर्णय जिल्हा न्यायालयाने बुधवारी दिला होता. तर ‘मी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले’, असे जिल्हा न्यायदंडाधिकारी एस. राजिलगम यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court order gyanvapi masjid committee to appeal in high court zws
Show comments