पीटीआय, नवी दिल्ली

संभल जामा मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळील खासगी विहिरीच्या वादाविषयी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ‘जैसे थे’ स्थिती राखण्याचा आदेश दिला आहे. तसेच, मशीद व्यवस्थापन समितीने केलेल्या याचिकेवर नोटीस बजावली आहे.

Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक

हेही वाचा >>>Cardiac Arrest : तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू! कर्नाटकनंतर गुजरातमध्येही समोर आला धक्कादायक प्रकार

सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्या. संजय कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले, की सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय विहिरीबाबत कुठलेही पाऊल उचलण्यात येऊ नये. तसेच, प्रशासनाला आताच्या स्थितीबाबत दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

याप्रकरणी मशीद व्यवस्थापन समितीने याचिका दाखल केली आहे. संभल सत्र न्यायालयाने १९ नोव्हेंबर २०२४ रोजी मशिदीचा सर्व्हे करण्यासाठी आयुक्तांची नेमणूक करण्याची परवानगी दिली होती. त्याला मशिदीच्या व्यवस्थापन समितीने आव्हान दिले होते.

व्यवस्थापन समितीची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील हुजेफा अहमदी यांनी विहिरीचे ऐतिहासिक महत्त्व न्यायालयात सांगितले. तसेच, या ठिकाणी ‘हरि मंदिर’ असल्याच्या संदर्भाने दिलेल्या नोटिशीवर चिंता व्यक्त केली.

Story img Loader