Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सोमवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. हिंदुत्व हा शब्द बदलण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी पार पडली. या याचिकेत ‘हिंदुत्व’ हा शब्द बदलण्याची मागणी करण्यात आली होती. ही याचिका डॉ.एस.एन. कुंद्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी या याचिकेवरील सुनावणीवेळी महत्वाची टिप्पणी देखील केली. हिंदुत्व या शब्दाऐवजी भारतीय संविधान हा शब्द वापरण्याची मागणी करणारी याचिका डॉ.एस.एन. कुंद्रा यांनी दाखल केली होती. या याचिकेवर विचार करण्यास सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी नकार दिला. ही सुनावणी आज सोमवारी (२१ ऑक्टोबर) सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

हेही वाचा : Rohini Blast : दिल्लीतील स्फोटामागे खलिस्तानी समर्थक गट? टेलिग्राम चॅनेलवरील व्हिडिओमुळे खळबळ! पोलीस म्हणाले…

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे.बी.पारदीवाला आणि न्यायमूर्ती ननोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्याच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. तसेच सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे.बी.पारदीवाला आणि न्यायमूर्ती मिश्रा यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. यावेळी न्यायालयाने (Supreme Court ) महत्वाची टिप्पणी केली.

यावेळी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड ((DY Chandrachud)) यांनी म्हटलं की, “हा प्रक्रियेचा पूर्ण दुरुपयोग आहे. आम्ही त्यावर विचार करणार नाही”, असं सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी म्हटलं. दरम्यान, यासंदर्भातील वृत्त लाइव्ह लॉच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. दरम्यान, दिल्लीतील विकासपुरी येथील रहिवासी एसएन कुंद्रा यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. मात्र, त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court rejected the petition seeking to change the word hindutva in the state constitution gkt