लोकसभा निवडणुकीसाठी अंतरिम जामीनावर बाहेर असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा जामीन ७ दिवसांसाठी वाढवण्याची मागणी केली होती. परंतु, त्यांची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने आज नाकारली आहे. वैद्यकीय कारणांसाठी ही याचिका करण्यात आली होती. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना आता २ जून रोजी तिहार तुरुंगात पुन्हा जावं लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरविंद केजरीवाल यांच्या मुख्य प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्या अंतरिम जामीनाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे आहे, असं २८ मे रोजी सुट्टीकालीन खंडपीठाने म्हटलं होतं. परंतु, त्यांच्या जामीन याचिकेवर तत्काळ सुनावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, रजिस्ट्रीने तत्काळ सुनावणीला नकार दिला.

अरविंद केजरीवाल यांचं वजन अचानक कमी होऊ लागलं आहे. किडनी खराब होणे, गंभीर हृदयरोग आणि कर्करोगासारखे हे लक्षण असल्याने पीईटी सीटी स्कॅनसह इतर वैद्यकीय चाचण्यांसाठी त्यांना सात दिवसांसाठी अंतरिम जामीन वाढवून हवा होता. याकरता त्यांनी २६ मे रोजी नवी याचिका दाखल केली होती. २ जून ऐवजी ९ जूनला तुरुंगात परतण्याची त्यांनी परवानगी त्यांनी मागितली. परंतु, ही याचिका सर्वोच्च न्यायलयाच्या रजिस्ट्रीनेच फेटाळून लावली आहे.

दरम्यान, दिल्लीतील मद्य धोरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. यामध्ये अरविंद केजरीवाल यांचा सहभाग असल्याचा आरोप असून या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. तसेच मनीष सिसोदिया यांनी मद्य परवाना देताना त्या बदल्यात पैसे घेत गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. सध्या मनीष सिसोदिया हे तुरुंगात आहेत. तसेच या दिल्लीतील मद्य धोरणातील पैसे गोवा विधानसभा निवडणुकीत वापरल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्यावरही कारवाई झालेली आहे.

हेही वाचा >> अरविंद केजरीवालांच्या आणखी एका मंत्र्याच्या अडचणीत वाढ; मानहानीच्या प्रकरणात न्यायालयाने बजावले समन्स

अतिशी नाईक यांनाही समन्स

दिल्लीच्या मंत्री आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात समन्स बजावले असून २९ जून रोजी हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आतिशी यांना २९ जून रोजी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट तानिया बामनियाल यांच्यासमोर हजर राहावे लागणार असून मंत्री आतिशी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी आतिशी यांनी भाजपावर गंभीर आरोप केले होते. त्या प्रकरणात त्यांना हे समन्स बजावण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court rejects arvind kejriwals plea extend interim bail for medical treatment sgk
Show comments