न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही गुंतवणूकदारांचे पैसे न परतवल्याप्रकरणी सहारा समुहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांना बुधवारी कंपनीच्या तीन संचालकांसह न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान या खटल्याच्या सुनावणीला हजर राहण्याची सक्ती करण्यात येऊ नये यासाठी सुब्रतो रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका फेटाळत के.एस. राधाकृष्णन आणि जे.एस. केहार यांच्या खंडपीठाने सुब्रतो रॉय यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सुब्रतो रॉय यांच्या याचिकेवर निकाल देताना कायद्याचे नियम हे पाळले गेले पाहिजेत असे न्यायालयाच्या निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे.  यापूर्वी २० फेब्रुवारी रोजी गुंतवणूकदारांचे २०,००० कोटी रुपये न परतवल्याप्रकरणी ‘सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्प लिमिटेड’च्या तीन संचालकांसह सुब्रतो रॉय यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते.

Story img Loader