देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सक्तीचं धर्मांतर हा गंभीर मुद्दा असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. या समस्येवर केलेल्या उपाययोजनांबाबत आठवड्याभराच्या आत माहिती देण्यासही केंद्र सरकारला सांगण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“हे अजिबात स्वीकारार्ह नाही”, सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला फटकारलं!

“देशात सक्तीचं धर्मांतर होत असेल, तर हा खरंच गंभीर मुद्दा आहे. याचा परिणाम देशाच्या सुरक्षेसह नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर होऊ शकतो”, असं न्यायमूर्ती एनआर शाह आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

खळबळजनक! प्रेयसीच्या शरीराचे ३५ तुकडे केले; विल्हेवाट लावण्यासाठी…; मुंबईत सुरु झालेल्या लव्हस्टोरीचा दिल्लीत करुण अंत

“सक्तीचं धर्मांतर रोखण्यासाठी केंद्राने प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. अन्यथा देशात गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. या प्रकरणात केंद्राने लक्ष घालणं गरजेचं असून न्यायालयाने काय कृती करावी हे केंद्रानं सुचवलं पाहिजे”, असे न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले आहे.

Thackeray vs Shinde: “३० वर्षं शिवसेना चालवली पण आज वडिलांचं नाव व पक्षाचं चिन्ह…”; उद्धव ठाकरेंनी हायकोर्टात मांडली व्यथा

देशातील सक्तीच्या धर्मांतराच्या मुद्द्यावरुन दिल्लीतील भाजपा नेते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court said forced religious conversion is very serious issue directed modi government to take a stand rvs