सीबीएसईने घेतलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे निकाल नऊ जूनपर्यंत जाहीर न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले. चार मे रोजी घेतलेल्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणाचा हरयाणा पोलीस तपास करीत आहेत. त्यामुळेच त्याचे निकाल जाहीर न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या सुटीतील खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रफुल्ल पंत आणि न्यायमूर्ती अमितवा रॉय यांनी हे आदेश दिले. पोलीसांनी त्यांचा तपास अहवाल न्यायालयाकडे सुपूर्द केल्यावर ही परीक्षा पुन्हा घ्यायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार हे निकाल सीबीएसई पाच जून रोजी जाहीर करणार होती.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jun 2015 रोजी प्रकाशित
सीबीएसईच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे निकाल तूर्त स्थगित
सीबीएसईने घेतलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे निकाल नऊ जूनपर्यंत जाहीर न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले.

First published on: 03-06-2015 at 05:15 IST
TOPICSवैद्यकीय प्रवेश परीक्षा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court stays pre medical entrance test results