Supreme Court To Hear Case On CEC Appointment: मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांच्या नेमणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. या दोन्ही नेमणुका “मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त कायदा, २०२३” या कायद्यानुसार झाल्या होत्या. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि ए. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाला माहिती दिली की, निवडणूक आयुक्तांच्या निवडीतून सरन्यायाधीशांना वगळण्यात आले आहे. ही लोकशाहीची थट्टा असल्याचे त्यांनी म्हटले.

Live Updates

SC to hear Pleas against CEC LIVE | सर्वोच्च न्यायालयातील मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्ती प्रकरणाचे लाईव्ह अपडेट्स

15:33 (IST) 19 Feb 2025

SC to hear Pleas against CEC LIVE: पुढील सुनावणी १९ मार्चला घेण्यास याचिकाकर्त्यांचा विरोध

आज खंडपीठासमोर इतर अनेक प्रकरणे असल्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ मार्चला घेऊया, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले. मात्र हे प्रकरण लोकशाहीसाठी अतिमहत्त्वाचे असून एक तासही वाया घालवून चालणार नसल्याचे सांगत याचिकाकर्ते प्रशांत भूषण यांनी आजच सुनावणी व्हावी, अशी मागणी केली.

https://twitter.com/LiveLawIndia/status/1892144092324221069

15:02 (IST) 19 Feb 2025

SC to hear Pleas against CEC LIVE: प्रत्येक प्रकरण महत्त्वाचे, तम्ही गोष्टी फिरवून सांगू नका - न्या. कांत

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचे प्रकरण सर्वात महत्त्वाचे असल्याचे सांगितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्या. कांत म्हणाले की, प्रत्येक प्रकरण महत्त्वाचेच असते. तुम्ही तुमचेच प्रकरण जास्त महत्त्वाचे आहे, हे सांगण्यासाठी गोष्टी फिरवू नका.

https://twitter.com/LiveLawIndia/status/1892133532778074484

14:59 (IST) 19 Feb 2025

SC to hear Pleas against CEC LIVE: मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड सरकारने करणे लोकशाहीसाठी धोका

सर्वोच्च न्यायालयात मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्तीबद्दलची सुनावणी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यावेळी म्हणाले की, हे प्रकरण लोकशाहीच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहे. जर मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक केंद्र सरकारने केली तर १४० कोटी लोकांवर त्याचा थेट परिणाम होईल.

https://twitter.com/barandbench/status/1892133335004057769

14:53 (IST) 19 Feb 2025

प्रशांत भूषण यांच्या याचिकेला समर्थन देण्यासाठी खासदार महुआ मोईत्रा यांचीही याचिका

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनीही निवडणूक आयुक्त कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.

https://twitter.com/LiveLawIndia/status/1892139195365494986

12:24 (IST) 19 Feb 2025

याचिकाकर्ते प्रशांत भूषण महाधिवक्ता तुषार मेहता यांच्यावर संतापले

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली असता केंद्र सरकारची बाजू मांडणारे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी दुसऱ्या प्रकरणात व्यस्त असल्यामुळे याची सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. यावर याचिकाकर्ते प्रशांत भूषण यांनी महाधिवक्ता नसतील तर सुनावणी होणारच नाही का? असा सवाल विचारत त्यांना धारेवर धरले.

https://twitter.com/LiveLawIndia/status/1892081719890657557

12:18 (IST) 19 Feb 2025

२६वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

ज्ञानेश कुमार यांनी देशाचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.

https://twitter.com/ANI/status/1892063808665063524

11:46 (IST) 19 Feb 2025

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांचा कार्यकाळ कसा राहिला?

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे १८ फेब्रुवारी २०२५ रोजी निवृत्त होत आहेत. निवडणूक आयोगात जवळपास साडेचार वर्षं काम केल्यानंतर मंगळवारी त्यांची मुदत आज संपली. राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली देशातील ३१ विधानसभा निवडणुका, तसेच २०२४ ची लोकसभा निवडणूक पार पडली. वाचा संपूर्ण लेख

11:45 (IST) 19 Feb 2025

SC to hear Pleas against CEC LIVE: मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्तीवरून काँग्रेसचा सवाल, एवढी घाई का? विचारला सवाल

मुख्य निवडणूक आयुक्त निवडीची घाई केली जात असल्याबद्दल निवड समितीचे सदस्य आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आक्षेप नोंदविला आहे. तसेच केंद्राने अहंकार बाजूला ठेवून निवडप्रक्रिया पुढे ढकलावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. वाचा सविस्तर बातमी

11:43 (IST) 19 Feb 2025

SC to hear Pleas against CEC LIVE: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कोण आहेत?

Who is Gyanesh Kumar: ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. वाचा सविस्तर बातमी

Who is New CEC Gyanesh Kumar

ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड

Story img Loader