एन. श्रीनिवासन यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यापासून रोखावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दाखल करून घेतली. बिहार क्रिकेट मंडळाने दाखल केलेल्या या याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. न्या. ए. के. पटनाईक यांच्या नेतृत्त्वाखालील पीठामध्ये याप्रकरणी सुनावणी होईल.
येत्या २९ सप्टेंबरला होणाऱया बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. सध्या मंडळाचे अध्यक्ष असलेल्या श्रीनिवासन यांनी पुन्हा निवडणुकीला उभे राहणार असल्याचे गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते. त्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली. या विषयावरील न्यायालयातील सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत श्रीनिवासन यांची बीसीसीआयच्या कोणत्याही समितीवर निवड करण्यात येऊ नये, अशीही मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
श्रीनिवासन यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास अंतरिम स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
बीसीसीआय निवडणूक: श्रीनिवासन यांच्याविरोधातील याचिका दाखल; शुक्रवारी फैसला
बिहार क्रिकेट मंडळाने दाखल केलेल्या या याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

First published on: 24-09-2013 at 12:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court to hear plea to restrain srinivasan from contesting for bcci post