Supreme Court Divorce Case Advice: सुप्रीम कोर्टात घटस्फोटाची मागणी करणाऱ्या बंगळुरूच्या एका जोडप्याला न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेला मोलाचा सल्ला सध्या चर्चेत आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या की, बंगळुरू हे असे ठिकाण नाही जिथे घटस्फोट वारंवार होतात आणि या जोडप्याला त्यांच्या एकत्र येण्याची संधी मिळू शकते.
न्यायमूर्ती के एम जोसेफ आणि बी व्ही नागरत्ना यांच्या खंडपीठाने सांगितले, “लग्नासाठी वेळ कुठे आहे? तुम्ही दोघेही बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करता. एकजण दिवसा ड्युटीवर जातो आणि दुसरा रात्री. तुम्हाला लग्नाचा पश्चाताप आहे, पण घटस्फोटाची कोणतीही खंत नाही. हा निर्णय घेण्याआधी तुम्ही लग्नाला दुसरी संधी का देत नाही? “
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाला दोन्ही पक्षाच्या वकिलांनी सांगितले की, याचिका प्रलंबित असताना त्यांच्यात एकोपा होण्याची शक्यता असल्यास पक्षकारांना सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थी केंद्राकडे पाठविण्यात आले होते.मात्र जोडप्याने घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम राहण्याचे ठरवले आहे. हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम १३ब अंतर्गत अटी व नियमांनुसार परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा<< प्रसिद्ध गायिकेला अँकरने इतकी हीन वागणूक दिली की मंचावरच… Video मध्ये रडत म्हणाली “मी मरत नाही, चारचौघात…”
याशिवाय,वकिलांनी खंडपीठाला सांगितले की, पतीने पत्नीच्या सर्व आर्थिक दाव्यांची कायमस्वरूपी पोटगी म्हणून एकूण १२.५१ लाख रुपये द्यावेत अशी एक अटी होती. तसेच राजस्थान आणि लखनऊमध्ये पती-पत्नीने हुंडा बंदी कायदा, कौटुंबिक हिंसाचार कायदा या अंतर्गत दाखल केलेल्या इतर विविध कार्यवाही रद्द करण्यात आल्या आहेत.