नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणीसाठी सूचिबद्ध केली आहे. केजरीवाल यांच्यावर मद्या धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करून सीबीआयने त्यांना अटक केली आहे. केजरीवाल यांनी या अटकेला आव्हान देणारी आणि जामीन मागणारी अशा दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> PM Modi : “पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं मोठी चूक”, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगितले नियम

सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड केलेल्या सूचीनुसार, न्या. सूर्य कांत आणि न्या. उज्जल भूयां यांच्या खंडपीठासमोर केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. खंडपीठाने यापूर्वी ५ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकेवरील निकाल राखीव ठेवला होता. सीबीआयने केजरीवाल यांना २६ जूनला अटक केली होती. त्याविरोधात त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने ५ ऑगस्टला दिलेल्या निकालात केजरीवाल यांची अटक ग्राह्य ठरवली होती. ‘‘ही अटक न्याय्य कारणाविना किंवा बेकायदा असल्याचे म्हणता येणार नाही,’’ असे न्यायालयाने तेव्हा नमूद केले होते.

‘आप’ला सुटकेची आशा

सर्वोच्च न्यायालयाकडून केजरीवाल यांना जामीन मिळेल अशी आम आदमी पक्षाला आशा वाटत असल्याचे पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांनी शुक्रवारी सांगितले. चढ्ढा विधानसभा निवडणूक प्रचारासाठी हरियाणात होते. आम्ही निकालाची वाट पाहत आहोत असे ते म्हणाले.