पीटीआय, नवी दिल्ली

अर्जदाराच्या जमिनीवर सहा दशकांहून अधिक काळ अतिक्रमण करण्यात आले आहे. संबंधितांना नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकारच्या मोफत योजनांना स्थगिती देऊ, असा इशाराच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मोफत योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्चाला निधी आहे. मात्र एखाद्या व्यक्तीची जमीन बेकायदेशीररित्या बळकावल्यास त्याला मदतीसाठी पैसे नाहीत, अशा शब्दात न्यायालयाने सरकारला फटकारले.

उत्तर प्रदेशला ३१ हजार कोटी तर बिहारला १७ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याबद्दल कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.
केंद्राकडून महाराष्ट्राला १०,९३० कोटी; उत्तर प्रदेश, बिहारला अधिक निधी दिल्यावरून टीका
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
illegal constructions Mumbai
मुंबई : अनधिकृत बांधकामांवर २०० टक्के दंड, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश
Maharashtra Sadan not available for Sahitya Sammelan Delay for four months on fee issue Nagpur news
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मिळेना! शुल्काच्या मुद्द्यावर चार महिन्यांपासून खल
Loksatta editorial on Goods and Services Tax GST Collection
अग्रलेख: अल्पात अडकणे अटळ?
Image of FASTag logo
राज्यातील सर्व वाहनांना एक एप्रिलपासून FasTag बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय
Asaram Bapu Interim Bail from Supreme Court
Asaram Bapu Bail: मोठी बातमी! बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Court orders on state government officials regarding land compensation
‘भरपाई टाळण्यासाठी कायद्याचे बेधडक उल्लंघन’; राज्य सरकारी अधिकाऱ्यांवर न्यायालयाचे ताशेरे

महाराष्ट्र सरकारचे वर्तन आदर्श राज्याला अनुरूप असे नाही, अशी नाराजीही न्यायालयाने व्यक्त केली. या प्रकरणात सरकारने ३७.४२ कोटी भरपाईची तयारी दर्शवली होती. मात्र अर्जदाराच्या वकिलांनी ही रक्कम ३१७ कोटी असल्याचे निदर्शनास आणले. यावरून न्यायमूर्ती बी. आर. गवई व के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सरकारवर ताशेरे ओढले.

हेही वाचा >>>Mamata Banerjee : “विरोधकांकडून राज्यात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न”; कोलकाता बलात्कार प्रकरणावरून ममता बॅनर्जींनी सुनावलं!

याप्रकरणी उच्चस्तरीय पातळीवर विचारविनिमय होण्यासाठी तसेच मदत देताना सरकारसाठी नियमावली असल्याने तीन आठवड्यांचा कालावधी द्यावा, अशी मागणी राज्याच्या वतीने अॅड.निशांत आर. कंटेश्वरकर यांनी केली. त्यावर तुमची मागणी मान्य करतो, मात्र तोपर्यंत आमच्या परवानगीखेरीज लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजनांची अंमलबजावणी करता येणार नाही, असा अंतरिम आदेश देऊ असे खंडपीठाने खडसावले.

तुमच्या निर्देशांचा सन्मान करतो, मात्र यातील काही टिप्पणीमुळे माध्यमांचा तो मथळा झाला असे युक्तिवादादरम्यान कंटेश्वरकर यांनी नमूद केले. याप्रकरणी पुढील सुनावणी २८ ऑगस्टला होईल.

Story img Loader