कर्नाटकच्या उडुपीमध्ये हिजाब घालून महाविद्यालयात येणाऱ्या मुस्लीम मुलींना प्रवेश नाकारल्यावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता कर्नाटकमधील भाजपा आमदारानं केलेल्या वादग्रस्त विधानावरून देखील वातावरण तापू लागलं आहे. या घटनांचे पडसाद थेट संसदेत देखील उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत या मुद्द्यावरून संतप्त सवाल उपस्थित केला आहे. एकीकडे हिजाबच्या वादावर त्यांनी टीका केली असताना दुसरीकडे भाजपा आमदारांच्या विधानाचा देखील त्यांनी निषेध केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाले भाजपा आमदार?

कर्नाटकमध्ये हिजाबवरून वाद सुरू असताना कर्नाटकमधलेच भाजपा आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांनी हे विधान केलं आहे. “महाविद्यालये किंवा शाळांमध्ये शिकताना विद्यार्थ्यांनी गणवेश किंवा त्यांचं शरीर पूर्णपणे झाकलं जाईल असे कपडे घालायला हवेत. महिला परिधान करत असलेले काही कपडे पुरुषांना उत्तेजित करतात, त्यामुळे बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. हे योग्य नाही. कारण महिलांना आपल्या देशात आदर आहे, आपण महिलांना माता मानतो”, असं ते म्हणाले आहेत.

सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल

दरम्यान, या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी संतप्त सवाल उपस्थित केला आहे. “कर्नाटकच्या भाजपा आमदारांनी म्हटलंय की महिलांच्या पोशाखांमुळे बलात्काराच्या घटना वाढत आहेत. हिजाब घातला, तरी भाजपाला अडचण आहे. दुसरे कपडे घातले, तरीही त्यांना अडचण आहे. ते मॉरल पोलिसिंग करणार आणि थॉट पोलिसिंग देखील करणार का?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.

“महिलांचे काही पोशाख पुरुषांना उत्तेजित करतात, म्हणून बलात्कार होतात”, भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान!

“आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण देखील कर्नाटकमधून निवडून आल्या आहेत. मी त्यांना विनंती करते की जे कुणी हे भाजपा सदस्य आहेत, त्यांचा निषेध व्हायला हवा. या सगळ्या सभागृहाला मी आवाहन करते की सगळ्यांनी एकत्रपणे या विधानाचा निषेध करायला हवा. सगळ्यांच्या घरी बायका-मुलं आहेत. जर कुणीही असं म्हणत असेल की महिलांवर कपड्यांमुळे बलात्कार होतात, तर मला वाटतं हे निषेधार्ह आहे. हे लाजिरवाणं आहे”, असं सुप्रिया सुळे यावेळी लोकसभेत बोलताना म्हणाल्या.

दरम्यान, या सगळ्या वादानंतर रेणुकाचार्य यांनी आपल्या विधानाविषयी माफी मागिदरम्यान, आपल्या विधानावर वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात येताच रेणुकाचार्य यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. “जर माझ्या विधानामुळे आपल्या भगिनी दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्यासाठी नक्कीच माफी मागेन. मी महिलांचा आदर करतो”, असं ते म्हणाले.