समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. ते ८२ वर्षांचे होते. मुलायमसिंह यादव यांचे पुत्र अखिलेश यादव यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील दु:ख व्यक्त केले आहे. ते देशातील सर्वोच्च समाजवादी नेत्यांपैकी एक होते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

हेही वाचा >>>Mulayam Singh Yadav Death: मोदीही हळहळले! मुलायम यांच्यासोबतचे आठ फोटो पोस्ट करत म्हणाले, “मी कायम त्यांची मतं…”

माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले आहे. नेताजी मुलायमसिंह यादव हे देशातील सर्वोच्च समाजवादी नेत्यांपैकी एक होते, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा >>> Mulayam Singh Yadav Death: मुलायम सिंह यादव यांचं निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

त्यांचा दांडगा लोकसंपर्क होता. संसदेत त्यांचे काम बघण्याची मला संधी मिळाली. प्रत्येक कार्यकर्त्याचे त्यांच्याशी प्रेमाचे नाते होते. आम्ही त्यांना प्रेमाने नेताजी म्हणायचो. ते आले की त्यांच्याभोवती खासदार आमदार जमायचे. ते मनाने शेतकरी होते. ते अतशिय प्रेमळ आणि दिलदार होते. त्यांच्या मनात कधीही कोणाबद्दल आकस नव्हता. त्यांना सोडून गेलेल्या लोकांशीही ते अनेकदा प्रेमाने भेटत, गप्पा करत. ते शेवटी व्हिलचेअरवर संसदेत यायचे. त्यांचे निधन म्हणजे आमच्या सर्वांसाठी खूप मोठी हानी आहे, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> “भाजपा कार्यकर्ते मला भेटतात आणि सांगतात…”, अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा

मुलायम यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३९ साली उत्तर प्रदेशमधील इटावा येथे झाला. त्यांनी अगदी तरुण वयापासून राजकारणात सक्रीय सहभाग घेतला होता. मुलायम सिंह यादव यांनी तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. तसेच १९९६ ते १९९८ दरम्यान ते केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्रीही होते. १९९२ साली मुलायम सिंह यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. ५ डिसेंबर १९८९ रोजी मुलायमसिंह यांनी पहिल्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. ते २४ जानेवारी १९९१ पर्यंत या पदावर कार्यकरत होते. नंतर मायावती राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. १९९२ साली समाजवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर वर्षभरात म्हणजेच ५ डिसेंबर १९९३ रोजी मुलायमसिंह दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले होते.

Story img Loader