जम्मू-काश्मिरच्या कटुआ येथे शुक्रवारी दहशवाद्यांशी लढताना साताऱ्यात राहणारा सूरज मोहिते हा तरूण शहीद झाला. सूरज हा २२ वर्षांचा असून, तो सीआरपीएफच्या तुकडीत सामील होता. सीआरपीएफच्या १२१व्या बटालियनमधील ई कंपनीत कॉन्स्टेबलच्या हुद्द्यावर सूरज मोहिते कार्यरत होता. कटूआ जिल्ह्यातील राजबाग पोलिस ठाण्यावर शुक्रवारी सकाळी ६.२०च्या सुमारास दहशतवाद्यांच्या आत्मघातकी पथकाने चढविलेल्या या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सूरज मोहिते यांच्यासह स्थानिक पोलीस कर्मचारी आणि एका नागरिकाचा समावेश आहे.
शुक्रवारी सकाळी तीन ते चार दहशतवाद्यांचे टोळके राजबाग पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरील पहारेकऱ्यांवर गोळीबार करीत आतमध्ये शिरले. त्यानंतर या ठिकाणी दाखल झालेले सीआरपीएफचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू होती. दुपारपर्यंत या ठिकाणचा गोळीबार थांबला असला तरी पोलीस ठाण्याच्या आतमध्ये अजूनही काही दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना मारण्यात यश आल्याचे सांगण्यात येत असले तरी लष्कराकडून याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा