बलात्काराचा आरोप असलेले स्वयंघोषित गुरू आसाराम बापू यांचा मुलगा नारायण साईच्या शोधासाठी गुजरात आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्तपणे दिल्लीत छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.
नारायण साईचा पोलिसांना चकमा..
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील आसारामा बापूंच्या रोहिणी आणि नजफगड येथील आश्रमांवर पोलिसांनी छापे टाकले. परंतु, तेथेही नारायण साईचा शोध लागलेला नाही. पोलिसांकडून नारायण साई बाबत इतरही चौकशी आश्रमात केली जात आहे.
नारायण साईकडून निर्दोष असल्याच्या जाहिराती
सुरतमधील दोन बहिणींनी आसारामबापूंसह नारायण साईवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आसारामा बापू पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस नारायण साईच्या शोधात आहेत.
पोलीस नारायण साईच्या मागावर, देश सोडण्यास मनाई

Story img Loader