Suresh Gopi Wants to do Films : केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस विभागाचे राज्यमंत्री सुरेश गोपी बुधवारी (२१ ऑगस्ट) एका कार्यक्रमात म्हणाले, “अभिनय ही माझी आवड आणि करिअर म्हणून पहिली पसंती आहे. मला चित्रपटांमध्ये काम करण्यापासून रोखल्यास मी मरून जाईन”. सुरेश गोपी हे मल्याळमसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करतात. प्रामुख्याने मल्ल्याळम चित्रपटसृष्टीत त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांनी त्रिशूर मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली व जिंकली होती. पहिल्याच प्रयत्नात खासदार झालेल्या सुरेश गोपी यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी केंद्रीय राज्यमंत्रिपदही दिलं आहे. दरम्यान, बुधवारी ते तिरुअनंतपुरममधील केरळ फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले की “चित्रपट ही माझी पहिली पसंती आहे. चित्रपटांमध्ये काम करणं बंद केलं तर मी मरून जाईन”.

सुरेश गोपी म्हणाले, “मी ओट्टाकोंबन (Ottakkomban) हा चित्रपट करण्याची परवानगी मागितली आहे. परंतु, अद्याप मला परवागनी मिळालेली नाही. परंतु, मी ६ सप्टेंबरपासून चित्रपटाच्या कामाला सुरुवात करत आहे”.

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”

अन् अमित शाहांनी हातातले कागद फेकून दिले : सुरेश गोपी

केंद्रीय राज्यमंत्री सुरेश गोपी म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला विचारलं की तुम्ही किती चित्रपट साईन (करार) करून ठेवले आहेत? त्यावर मी उत्तर दिलं की मी २० ते २२ चित्रपट करण्यास (दिग्दर्शक-निर्मात्यांना) होकार दिला आहे. हे ऐकून त्यांनी त्याचा हातातले कागद फेकून दिले”. गोपी म्हणाले, “मी नेहमी आमच्या नेत्यांचे आदेश पाळेन. मात्र चित्रपट ही माझी पहिली पसंती आहे. मी चित्रपट केले नाहीत तर मी मरून जाईन”.

राज्यमंत्री सुरेश गोपी म्हणाले, मी चित्रपट करत असेन तेव्हा मंत्री म्हणून माझी कामं करण्यासाठी मी मंत्रालयातील तीन ते चार लोकांना घेऊन जाईन. हे सोपं झालं तर मला काम करणं बरं पडेल. तसेच मला त्रिशूर मतदारसंघातील लोकांना अधिक वेळ देता येईल, त्यांची कामं करता येतील.

हे ही वाचा >> Badlapur Case : “हा नराधम माणूस म्हणवण्याच्या लायकीचा नाही”, किरण मानेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; म्हणाले, “बदलापूरबाबत थापा मारणारा…”

सुरेश गोपी यांनी मंत्रिपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती

केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दोन दिवसांनी सुरेश गोपी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं की “मला केवळ खासदार म्हणून काम करत राहायचं आहे. मी आमच्या पक्षश्रेष्ठींकडे काहीच मागितलं नव्हतं. मी त्यांना म्हटलं होतं की मला या पदाची आवश्यकता नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की मी लवकरच पदमुक्त होईन. मात्र त्रिशूरमधील मतदारांचं मी नुकसान होऊ देणार नाही. त्यांच्यासाठी व माझ्या मतदारसंघासाठी मी काम करत राहीन. माझ्या मतदारांनाही याची कल्पना आहे