Suresh Gopi Wants to do Films : केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस विभागाचे राज्यमंत्री सुरेश गोपी बुधवारी (२१ ऑगस्ट) एका कार्यक्रमात म्हणाले, “अभिनय ही माझी आवड आणि करिअर म्हणून पहिली पसंती आहे. मला चित्रपटांमध्ये काम करण्यापासून रोखल्यास मी मरून जाईन”. सुरेश गोपी हे मल्याळमसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करतात. प्रामुख्याने मल्ल्याळम चित्रपटसृष्टीत त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांनी त्रिशूर मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली व जिंकली होती. पहिल्याच प्रयत्नात खासदार झालेल्या सुरेश गोपी यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी केंद्रीय राज्यमंत्रिपदही दिलं आहे. दरम्यान, बुधवारी ते तिरुअनंतपुरममधील केरळ फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले की “चित्रपट ही माझी पहिली पसंती आहे. चित्रपटांमध्ये काम करणं बंद केलं तर मी मरून जाईन”.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा