जळगावमधील घरकुल घोटाळ्यात अटक करण्यात आलेले शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला. याप्रकरणी १५ मेपर्यंत आरोपपत्र दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. जर १५ मेपर्यंत आरोपपत्र दाखल करणे शक्य नसेल, तर आणखी दोन आठवड्याची मुदत न्यायालयाने दिली आहे.
सुमारे १६९ कोटी रुपयांच्या घरकुल घोटाळ्यात सुरेश जैन यांना १० मार्च २०१२ रोजी अटक कऱण्यात आली होती. गेल्या जवळपास दहा महिन्यांपासून जैन यांच्यावर जीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत चार वेळा जैन यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी न्यायालयात जैन यांची बाजू मांडली.

Story img Loader