राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनादरम्यान एका स्विस कंपनीला नियम डावलून कंत्राट दिल्याने ९० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी आयोजन समितीचे निलंबित अध्यक्ष व काँग्रेस खासदार सुरेश कलमाडी यांच्यासह दहा जणांविरोधात फसवणुकीचे आरोप निश्चित करण्याचे आदेश दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी दिले. त्यामुळे कलमाडी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
२०१० साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धासाठी वेळदर्शक तंत्रज्ञान तसेच गुणफलक यंत्रणा पुरवण्यासाठी स्पेनच्या कंपनीची कमी रकमेची निविदा डावलून स्विस टायमिंग ओमेगा या कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचे या घोटाळय़ाचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या निदर्शनास आले होते. यामुळे सरकारी तिजोरीला ९० कोटींचा तोटा झाल्याचेही उघड झाले. त्यामुळे स्पर्धा आयोजन समितीचे तत्कालीन प्रमुख सुरेश कलमाडी व अन्य नऊ जणांविरोधात फसवणूक करणे, कटकारस्थान करणे व पदाचा दुरुपयोग या आरोपांखाली आरोप निश्चित करण्याचे आदेश विशेष सीबीआय न्यायालयाचे न्या. तलवंत सिंग यांनी शुक्रवारी दिले.
ऑलिम्पिक समितीचे माजी सचिव ललित भानोत, समितीचे महासंचालक व्ही. के. वर्मा, सुरजित लाल, ए. एस. व्ही. प्रसाद व एम. जयचंद्रन या पदाधिकाऱ्यांवरही आरोप निश्चित करण्यात येणार असून त्यासाठी न्यायालयाने सीबीआयला १० जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे.
कलमाडी कचाटय़ात!
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनादरम्यान एका स्विस कंपनीला नियम डावलून कंत्राट दिल्याने ९० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी आयोजन समितीचे निलंबित अध्यक्ष व काँग्रेस खासदार सुरेश कलमाडी यांच्यासह दहा जणांविरोधात फसवणुकीचे आरोप निश्चित करण्याचे आदेश दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-12-2012 at 04:43 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh kalmadi faces more trouble in cwg scam