२०१२मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत क्रीडा साहित्याची खरेदी करताना गैरव्यवहार झाल्याप्रकरणी झारखंड पोलिसांनी सोमवारी ‘भारतीय ऑलम्पिक संघटने’चे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांची चौकशी केली.
या प्रकरणातील साक्षीदार म्हणून कलमाडी यांची चौकशी झाली आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची लेखी उत्तरे दिली असल्याचे पोलीस सहाय्यक अधीक्षक आनंद जोसेफ तिग्गा यांनी सांगितले. कलमाडी यांच्या चौकशीतून या गैरव्यवहारप्रकरणी अनेक मोठय़ा लोकांची नावे बाहेर येऊ शकतात, म्हणून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांना चौकशीला बोलाविण्यासाठी समन्स पाठविण्यात आले होते, असे तिग्गा यांनी सांगितले. रांचीमध्ये जेव्हा राष्ट्रीय क्रीडा स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी कलमाडी हे ‘भारतीय ऑलम्पिक संघटने’चे अध्यक्ष होते.

Story img Loader