इंदिरा गांधी या भारताच्या सर्वात शक्तिशाली पंतप्रधान असल्याचे विधान केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. ते मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. अमेरिकेत आजपर्यंत एकही महिला राष्ट्रपती होऊ शकलेली नाही. मात्र, भारतात राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि पंतप्रधान अशी तिन्ही प्रमुख पदं महिलांनी भुषवली आहेत, असे प्रभू यांनी सांगितले. यादरम्यान, त्यांनी इंदिरा गांधी यांचा उल्लेख भारताच्या सर्वात शक्तिशाली पंतप्रधान असा केला. जगभरातील अनेक महिलांनी आपल्या प्रभावी कामगिरीने पुरूषांसाठीचे मापदंड बदलायला भाग पाडले आहे. भारतात तर महिलांनी आपल्या कार्यकौशल्याने एका संस्कृतीची उभारणी केली असल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले.

Story img Loader