मध्य प्रदेशच्या हरदा येथे मंगळवारी रात्री दोन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांच्या भीषण अपघातानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
एका भीषण रेल्वे अपघातानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी तात्काळ राजीनामा दिल्याची आठवण करून देत दिग्विजय यांनी सुरेश प्रभू यांनीही या रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी केली आहे.
फोटो गॅलरी- असा घडला मध्यप्रदेशातील भीषण रेल्वे अपघात
मध्यप्रदेशच्या हरदामध्ये मंगळवारी रात्री ‘कामायनी एक्सप्रेस’ आणि ‘जनता एक्सप्रेस’ या दोन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना भीषण अपघात झाला आहे. अपघातात आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी झाले आहेत. रेल्वेचे डबे नदीच्या प्रवाहात पडल्याने अनेक प्रवासी वाहून गेल्याची भीती आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेश रेल्वे अपघात: रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या राजीनाम्याची मागणी
मध्य प्रदेशच्या हरदा येथे मंगळवारी रात्री दोन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांच्या भीषण अपघातानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे.
First published on: 05-08-2015 at 09:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh prabhu should resign demand digvijay singh