रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी राज्य सरकारांनी रेल्वेला सहकार्य करावे, अशी इच्छा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली आहे.
राज्यांसमवेत आम्हाला संयुक्त प्रकल्प हवा आहे. स्थानकांच्या विकासासाठी, फेरविकासासाठी राज्य सरकारांनी रेल्वेला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येणार आहे, असे प्रभू यांनी हावडा स्थानकावर झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी सांगितले.
रेल्वेमंत्र्यांनी या वेळी पूर्व रेल्वे, दक्षिण-पूर्व रेल्वे आणि मेट्रो रेल्वेच्या अनेक प्रकल्पांचे येथे उद्घाटन केले. पश्चिम बंगाल हे देशातील एक महत्त्वाचे स्थान आहे. या राज्याच्या विकासासाठी रेल्वे आपल्या स्रोतांचे सहकार्य देईल, असेही प्रभू म्हणाले.
प्रवासी सेवा आणि पायाभूत सुविधांचा विकास यासाठी वेळ लागेल. आम्ही प्रवाशांच्या सेवेवर अधिक भर देत आहोत. प्रवाशांचे
समाधान महत्त्वाचे आहे, गेल्या १८ महिन्यांत आम्ही १००हून अधिक बाबींमध्ये पुढाकार घेतला आहे, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा