आपल्या ऑनलाइन नकाशा सेवेला अधिक व्यापक बनविण्यासाठी गुगलने खास भारतीयांसाठी आयोजिलेल्या ‘मॅपथॉन’ स्पर्धेला तीव्र आक्षेप घेत भारतीय सर्वेक्षण संस्थेने गुगलविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा मात्र दाखल झालेला नाही.गुगलने ‘मॅपथॉन’ स्पर्धेद्वारे लोकांना त्यांच्या भागातील स्थळांचा तपशील पाठविण्याचे आवाहन केले होते. १२ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत ही स्पर्धा झाली. या स्पर्धेमुळे देशाच्या संरक्षणास धोका पोहोचेल तसेच राष्ट्रीय नकाशा धोरणालाही त्याने छेद जाईल, असे भारतीय सर्वेक्षण संस्थेने २५ मार्च रोजी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Survey of india files police complaint against google