सूर्यानेल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांच्या राजीनाम्याच्या वाढत्या मागणीनंतर त्यांच्या पत्नीने आरोपांचे खंडन करत म्हटले आहे कि, जे लोक आरोप करत आहेत त्यांनी कधी कुरियन कुटुंबियांच्या भावनांना जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. कुरियन यांची पत्नी आणि सेवानिवृत्त शिक्षिका सुसन कुरियन यांनी एका खुलाशामध्ये असे म्हटले कि ज्या दिवशी पीड़ित मुलीसोबत एका गेस्ट हाउसमध्ये वाईट कृत्य होणयाचे आरोप लावण्यात येत आहेत त्या दिवशी त्यांचे पती घरीच होते आणि रात्रीचे जेवण दोघांनीही एकत्रच केले.
सुसन पुढे म्हणाल्या कि, ‘‘मला विश्वास आहे कि माझ्या पतीविरूध्द करण्य़ात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मी आणि माझ्या दोन्ही मुलींना विश्वास आहे कि, या प्रकरणात सत्याचाच विजय होईल. कुरियन यांच्या कुटुंबाला या गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे कि, जवळपास सतरा वर्षांनंतर कुरियन यांना प्रसारमाध्यमांकडून त्रास दिला जातोय आणि पुन्हा तेच आरोप लावण्यात येत आहेत जे न्यायालयात पडताळून पाहिल्यानंतर खोटे ठरले आहेत.
सुसन यांनी म्हटले कि, ‘‘महिलांच्या अधिकारांसाठी संघर्ष करणा-या लोकांनी कुरियन यांनाही एक कुटुंब आहे याचा विचार करायला हवा.’’
कुरियन यांनी स्वत:वर लागलेले आरोप आणि राजीनाम्याच्या मागणीचा विरोध करत म्हटले कि या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच आपला निर्णय दिला आहे.
राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपामध्ये म्हटले आहे कि, इडुक्की जिल्ह्याच्या सूर्यानेल्ली मध्ये राहणा-या मुलीचे जानेवारी, १९९६ साली अपहरण केले होते आणि तिला केरळ येथे नेऊन तिच्यावर अनेक लोकांनी बलात्कार केला होता.
पीड़ित मुलीने मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाला पत्र पाठवून कुरियन यांना सर्व आरोपांतून मुक्त करण्याच्या शीर्ष न्यायालयाच्या आदेशाच्या समीक्षेची मागणी केली होती.
कुरियन यांच्यावरील आरोपांचे त्यांच्या पत्नीकडून खंडन
सूर्यानेल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांच्या राजीनाम्याच्या वाढत्या मागणीनंतर त्यांच्या पत्नीने आरोपांचे खंडन करत म्हटले आहे कि, जे लोक आरोप करत आहेत त्यांनी कधी कुरियन कुटुंबियांच्या भावनांना जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही.
First published on: 13-02-2013 at 04:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suryanelli gangrape p j kuriens wife rubbishes charge against husband