एपी, मॅडिसन (अमेरिका)

विस्कॉन्सिन सर्वोच्च न्यायालयासाठी झालेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक समर्थित उमेदवार सुसान क्रॉफर्ड यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश इलॉन मस्क समर्थित एका उमेदवाराचा पराभव केला. सुसान क्रॉफर्ड या लोकशाही समर्थित असून त्यांच्या विजयामुळे सर्वोच्च न्यायालयात किमान तीन वर्षे उदारमतवादी बहुमत मजबूत झाले आहे. क्रॉफर्ड यांनी रिपब्लिकन समर्थित उमेदवार ब्रॅड स्किमल यांचा पराभव केला. या निवडणुकीत खर्चाचे सर्व विक्रम मोडित निघाले.

या निवडणुकीत स्किमल यांना ट्रम्प, मस्क आणि अन्य रिपब्लिकन राज्याचे माजी अॅटर्नी जनरल यांचा पाठिंबा होता, तर क्रॉफर्ड यांना माजी अध्यक्ष बराक ओबामा, अब्जाधीस मेगाडोनर जॉर्ज सोरोस यांच्यासह अन्य डेमॉक्रॅट्सने पाठिंबा दिला होता.

नोव्हेंबर महिन्यापासूनची देशातील पहिली मोठी निवडणूक ट्रम्प पदावर असताना पहिल्या महिन्यांत आणि मस्क यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल मतदारांना काय वाटते याची ही ‘लिटमस टेस्ट’ असल्याचे मानले जाते.

ट्रम्प यांच्या सरकारी कार्यक्षमता विभागाने फेडरल एजन्सींमध्ये हेराफेरी करून हजारो कामगारांना कामावरून काढून टाकले आहे.