सुशांत आत्महत्या करणं शक्य नाही. यासंदर्भात काहीतरी नक्कीच चुकीचं घडल्याची शंका आम्हाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. मात्र महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे आम्ही मागणी करतोय की केंद्रीय संस्थेच्या माध्यमातून या प्रकरणाची न्यायलयीन चौकशी केली जावी, अशी मागणी अभिनेता सुशांस सिंह राजपूत याच्या नातेवाईकांनी केली आहे. मूळचा बिहारमधील पाटण्याच्या असणाऱ्या सुशांतने रविवारी मुंबईतील राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. अतिशय हुशार, सुस्वभावी आणि हसतमुख असणाऱ्या सुशांतच्या आत्महत्येने मनोरंजन विश्वाला हादरवून सोडले. यशाच्या शिखरावर असताना आयुष्य संपवण्याचा निर्णय त्याने का घेतला? याचीच चर्चा सध्या सुरू आहे. अशातच आता त्याच्या कुटुंबाने या आत्महत्येसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in