Delhi HC Granted Bail To Sushil Kumar: दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सुशील कुमार ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती विजेता सागर धनखड याच्या हत्येप्रकरणी मे २०२१ पासून तिहार कारागृहात कैद आहे. न्यायाधीश संजीव नरुला यांनी आज सुशील कुमारला ५०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धनखड याच्या हत्येप्रकरणी मे २०२१ मध्ये कुस्तीपटू सुशील कुमारला अटक करण्यात आली होती. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला यापूर्वीही एका आठवड्यासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. ऑक्टोबर २०२२ मध्ये या प्रकरणात कुमार आणि इतर १७ जणांविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले होते.

काय प्रकरण आहे?

सागर धनखड हत्याकांड प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याच्या मित्रांना छत्रसाल स्टेडियमचा दरवाजा आतून बंद करून काठ्या, हॉकी आणि बेसबॉल स्टिकने ३० ते ४० मिनिटे मारहाण केली. ४ आणि ५ मे (२०२१) च्या मध्यरात्री जमिनीच्या वादातून कुमार आणि इतरांनी धनखड आणि त्यांच्या चार मित्रांना स्टेडियममध्ये मारहाण केल्याचा आरोप आहे.

या मारहाणीत गंभीर दुखापतींमुळे पुढे सागरचा मृत्यू झाला होता.

पोलीस तपासात असे दिसून आले की, मृत सागर आणि त्याच्या मित्रांचे दिल्लीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून अपहरण करून स्टेडियममध्ये आणण्यात आले होते. त्यानंतर स्टेडियमचे प्रवेशद्वार आतून बंद करण्यात आले आणि सुरक्षा रक्षकांना तेथून बाहेर काढले. “स्टेडियममध्ये, सर्व पीडितांना आरोपींनी घेरले आणि त्यांना क्रूरपणे मारहाण केली,” असे पोलिसांनी त्यांच्या १,००० पानांच्या अहवालात म्हटले आहे. सर्व पीडितांना सुमारे ३० ते ४० मिनिटे काठ्या, बॅट, हॉकी स्टिक, बेसबॉल बॅट इत्यादींनी मारहाण करण्यात आली.

खंडणी रॅकेट

या प्रकरणाच्या चौकशीत दोन्ही कुस्तीपटूंच्या गटातील लोक वादग्रस्त जमिनीची खरेदी-विक्री, कब्जा आणि खंडणी रॅकेटमध्ये कसे सहभागी होते हे उघड झाले होते. तपासात असेही आढळून आले की, गटातील लोक गुंड कला जठेदी आणि नीरज बवानिया यांच्याशी संबंधित होते.

कोण आहे सुशील कुमार?

दिग्गज कुस्तीपटू सुशील कुमार याने ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक खेळ प्रकारात दोन वेळा पदके जिंकली आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुशीलने ६६ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले होते. पुढे चार वर्षांनंतर, लंडन ऑलिंपिकमध्ये सुशीलने रौप्य पदक जिंकले होते.