बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची घेतलेली सदिच्छा भेट हा संस्काराचा भाग होता, अशा शब्दांत सत्तारूढ जद(यू)ने नितीशकुमार यांचे समर्थन केले. मात्र गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात नितीशकुमार यांच्यात याच संस्कारांचा अभाव का होता, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी उपस्थित केला आहे. नितीशकुमार पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी हस्तांदोलन करू शकतात, परंतु नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यास नकार देतात, असे सुशील मोदी यांनी ट्विट केले आहे.भारतीय राजकीय क्षेत्रासाठी अशा प्रकारची अस्पृश्यता योग्य आहे का, असे सवालही सुशील मोदी यांनी उपस्थित केले आहेत.

Story img Loader