‘कृपया कायद्याच्या चौकटीत राहूनच बोला..’ असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना दिला आहे. मात्र त्यांचा खरा रोख भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे अघोषित उमेदवार राहुल गांधी यांच्याकडे होता. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीत नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांनी परस्परांवर बरीच वादग्रस्त विधाने केली आहेत. या वक्तव्यांवरून बरेच रणकंदन माजले होते. या पाश्र्वभूमीवर शिंदे यांनी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना वरील सल्ला दिला आहे. ‘कोणीही कोणतेही विधान करताना ते अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे. कायद्याच्या कक्षेत येणार नाही असे काहीही न बोलणेच सर्वाच्या हिताचे आहे,’ असे शिंदे म्हणाले.
बोलताना कायद्याची चौकट सांभाळा
‘कृपया कायद्याच्या चौकटीत राहूनच बोला..’ असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सर्व
First published on: 12-11-2013 at 04:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushilkumar shinde for caution after rahul gandhi narendra modi speech row