पाटण्यातील गांधी मैदानावर आयोजित मोदींच्या सभेत रविवारी क्रूडबॉम्बचे सहा स्फोट झाले आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे एका चित्रपटाच्या संगीत अनावरणाच्या कार्यक्रमात व्यस्त होते. यावर शिंदेंची पाठराखण करत परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी सुशीलकुमार शिंदे यांना पाटणा स्फोटापलीकडेही आयुष्य आहे असे म्हटले आहे.
पाटण्यातील स्फोटानंतरही गृहमंत्री संगीत अनावरण सोहळ्यात व्यस्त
शिदेंची पाठराखण करत खुर्शिद म्हणाले, स्फोटासारख्या घटना घडत असतात. पण, आपण आपल्या नियोजित कार्यक्रमांत बदल करू शकत नाही. स्फोटानंतरही सभा रद्द करण्यात आली नाही. मोदींनी स्फोटानंतर जखमी झालेल्यांची भेटही घेतली नाही. तसेच सभेदरम्यान त्यांनी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल शब्दही उच्चारला नाही. त्यामुळे विरोधकांनी उगाच टीका करू नये.”
पाटण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात पाच जण ठार तर ६६ जण जखमी झाले. या घटनेनंतर तासाभरानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी रज्जो चित्रपटाच्या संगीत अनावरण कार्य़क्रमाला उपस्थित होते. यावर त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.
मी मुंबईत असल्यामुळेच कार्यक्रमाला हजर राहिलो. परंतू बॉम्बस्फोटाची सर्व माहिती घेऊनच कार्यक्रमाला आलो असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा