अफजल गुरुची दयेची याचिका फेटाळल्याची फाईल राष्ट्रपतींकडून माझ्याकडे ३ फेब्रुवारीला आली. फाशीची अमलबजावणी करावी, या आदेशावर मी चार फेब्रुवारीला स्वाक्षरी केली, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले. 
शिंदे म्हणाले, गृहमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर दयेच्या अर्जासंबंधीच्या फाईलवर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे मी सांगितले होते. त्याप्रमाणे अफजल गुरुची फाईल माझ्या शिफारशींसह राष्ट्रपतींकडे २३ जानेवारीला पाठविली होती. राष्ट्रपतींकडून दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर लगेचच फाशीची अमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Story img Loader