परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती खालावल्यामुळे काल त्यांना दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्या छातीदुखीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
सुषमा स्वराज यांना सोमवारी सकाळपासूनच छातीत दुखत होते. तब्येत अधिक बिघडल्यामुळे संध्याकाळी ५ वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री १० वाजता त्यांना कार्डिओ न्युरो सेंटरमध्ये हलवण्यात आलं. आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी रुग्णालयात जाऊन स्वराज यांची विचारपूस केली.
सध्या सुषमा स्वराज यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे, तसेच चिंतेचे कारण नसल्याचंही त्यांनी सांगितले आहे. स्वराज यांच्या काही चाचण्या पूर्ण झाल्या असून मंगळवारी अहवालानंतर अधिक माहिती मिळेल, असे एम्सचे प्रवक्ते अमित गुप्ता यांनी सांगितले.

Story img Loader