पायाभूत सुविधा असोत किंवा उत्पादक क्षेत्र भारतात तुम्हा सर्वाचे स्वागत आहे, अशा शब्दांत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी विविध देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले. स्वराज सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून या कालावधीत त्या १०० देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटी घेणार आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेस आलेली मरगळ झटकून तिला गतिमान करण्यासाठी नव्या सरकारने कंबर कसली आहे आणि त्याच दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखले आहेत, या प्रकल्पांद्वारे अनेक संधींची दालने आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी खुली झाली आहेत, असे आवाहन स्वराज यांनी ब्रिटन, नॉर्वे आणि ग्रीसच्या परराष्ट्रमंत्र्यांना केले.
गेल्या दोन दिवसांत स्वराज यांनी ब्रिटन, नॉर्वे, सुदान, मालदीव, किरगिझस्तान, ग्रीस आणि नायजेरिया या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली. या सर्वानीच नव्या सरकारने लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल स्वराज यांचे अभिनंदन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा