देशाला कॉंग्रेसमुक्त करण्यासाठी लढा उभारण्याची वेळ आली असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी सोमवारी कॉंग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. 
राजधानी नवी दिल्लीमध्ये पक्षाच्या महिला कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना स्वराज यांनी सत्ताधारी यूपीए सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, ब्रिटिशांच्या राजवटीतून देशाला मुक्त करण्यासाठी झाशीची राणी लक्ष्मीबाई हिने त्यावेळी लढा उभारला होता. आता आपण सगळ्या महिलांनी देशाला कॉंग्रेसमुक्त करण्यासाठी लढा उभारू. देशात सध्या भाजपला पूरक वातावरण आहे. कदाचित लोकसभेच्या निवडणुका मुदतपूर्व होण्याची शक्यता आहे. यूपीए सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकेल की नाही, याबद्दल शंका आहे. मिशन २०१४चे रुपांतर मिशन २०१३मध्येही होण्याची शक्यता असल्याचे स्वराज यांनी स्पष्ट केले.
महिलांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याबद्दल स्वराज यांनी चिता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, भारतामध्ये राजकारणामध्ये महिला आहेत. अंतराळातही महिलांनी झेप घेतलीये, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांनी उत्तुंग भरारी घेतलीये. मात्र, देशात महिला सुरक्षित नाहीत, ही अतिशय दुर्दैवी वस्तुस्थिती आहे.

Story img Loader