गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी पंतप्रधानपदासाठी नाव जाहीर केल्यानंतर आज (शनिवार) भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत.
लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, भाजप नेते अनंत कुमार, बलबीर पुंज यांनी आज सकाळी अडवानी यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. अडवाणी पुन्हा राजीनामा देतील की काय अशी भीती भाजप नेत्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे अडवाणींच्या मनधरणीसाठी पक्षाचे अनेक नेते प्रयत्न करत आहेत.अडवाणींची नाराजी डावलून नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्यात आले.  अडवानी यांनी मोदींची पंतप्रधानपदासाठी घोषणा करण्यात आल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांना पत्र लिहून त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आपण निराश व नाराज असल्याचे म्हटले होते. मोदींनी शुक्रवारी अडवानी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. आता आज पक्षाच्या नेत्यांची अडवानींची मनधरणी सुरू आहे. आडवानींचे पुढील पाऊल काय असेल, याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.