पंतप्रधानपदाचा उमेदवार भाजप योग्य वेळी ठरवेल, असे स्पष्ट करून या विषयावर प्रसारमाध्यमांना एवढे औत्सुक्य का आहे, अशी विचारणा लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सोमवारी येथे केली.
वेळ येईल त्यावेळी पक्ष योग्य निर्णय घेईल असे आम्ही याआधीही स्पष्ट केले असताना माध्यमांना या मुद्दय़ाची उठाठेव कशासाठी असा प्रश्न स्वराज यांनी पत्रकारांना केला. हिंदू दहशतवादाबद्दल केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि त्यांनी तो न दिल्यास भाजप संसदेचे कामकाज होऊ देणार नाही, असा इशाराही स्वराज यांनी दिला.

Story img Loader