भारतीय जनता पक्षाने(भाजप) पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केले असले तरी सुषमा स्वराज मोदींपेक्षा पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.
दिग्विजय म्हणतात, मोदींपेक्षा सुषमा स्वराज पंतप्रधानपदासाठी कितीतरी पटीने चांगल्या असल्याची अनेक कारणे आहेत. लोकसभेचा उत्तम अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. तसेच एका युवा नेत्यापासून ते लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्यापर्यंतचा त्यांचा प्रवास राहिला आहे. यात त्यांनी नागरिकांना भरपूर आश्वासने दिली मात्र, कोणतीही आश्वासने त्या पाळत नाहीत. तसेच त्या खोटे बोलण्यातही तरबेज आहेत लोकसभेत याचा अनेकवेळा अनुभव आलेला असल्याचेही दिग्विजय म्हणाले.
भाजपकडून लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याम्हणून त्यांनी सर्वाधिक चर्चांमध्ये भाग घेतला आहे. त्यामुळे मोदींपेक्षा स्वराज यांना पंतप्रधानपद सांभाळण्याचा अधिक अधिकार असल्याचे सर्वज्ञात परंतु, तसे झाले नाही. यातूनच भाजपमध्ये महिला नेतृत्वाला डावळले जात असल्याचे दिसून येत असल्याचेही दिग्विजय म्हणाले.  

Story img Loader